गोदावरी अभियांत्रिकीचे प्रा.डॉ.देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव (5 जून 2026) : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ.देवेंद्र प्रकाश मराठे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
डॉ.मराठे यांनी आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, सदस्य डॉ.वैभव पाटील, सदस्य डॉ.अनिकेत पाटील, सदस्य डॉ.अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ.प्रशांतजी वारके, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




