आधी पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलले नंतर पतीनेही केली आत्महत्या


Husband pushed wife and two daughters into a well, then committed suicide himself वाशीम (14 जून 2026) : कौटुंबिक वादानंतर संतप्त पतीने पत्नीसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकलले व नंतर स्वतःदेखील गळफास लावला. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या तिवळी गावात घडली. इंद्रायणी बकाल (28), जान्हवी बकाल (7), सोहम बकाल (5) व संतोष बकाल (35) अशी मृतांची नोव आहेत.

घटनेने उडाली खळबळ
संतप्त पतीने आधी पत्नीसह दोघा मुलींचे हात बांधून त्यांना विहिरीत ढकलले व संतोष बकालने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेतला. इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली.


एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला मात्र बहीण इंद्रायणीसह दोन चिमुकल्याचा आणि जावाई संतोष बकाल यांचा मृत्यू झाल्याने आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केला आहे.

संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे तर पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे सांगण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !