इलेक्ट्रिक मोटारींची चोरी करणारा चोरटा धुळे तालुका पोलिसांच्या जाळ्यात


Thief stealing electric motors caught in Dhule Taluka police net. धुळे (16 जून 2026) : धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतातील इलेक्ट्रिक पाण्याची मोटार चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून दुचाकीसह दोन इलेक्ट्रीक मोटारी मिळून 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मे 2026 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुसूंबा शिवारातील जानबारा धरणाजवळील दीपक भील यांच्या शेताजवळील वल्लभ काशीनाथ मालचे (35, मेहेरगाव) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक पाण्याची मोटार चोरी केली होती. याप्रकरणी शेतमालक धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित केली. गुप्त माहितीच्या आधारे दीपक नाना मोरे (20, रा.बल्हाणे, ता.धुळे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सात व 10 हजार रुपये किंमतीची मोटार व 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.41-542) जप्त करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, अंमलदार पंकज पाटील, विजय वायसे, भावेस झिरे, भटू पारधी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !