p>

भरधाव ट्रकच्या धडकेत कुर्‍हा-वढोद्याचे तलाठी ठार


वरणगाव : मुक्ताईनगर महामार्गावरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने समोरून येणार्‍या कारला धडक दिल्याने कुर्‍हा वढोदा गावाचे तलाठी ठार झाले. सोमवार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात धीरज दगडू ढेकणे (45, रा.काठी, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) यांचा मृत्यू झाला.

दरवाजा तोडून मृतदेह काढला बाहेर
रजा संपल्याने सेवेवर हजर होण्यासाठी धीरज ढेकणे हे महेंद्रा कार (एच.एच.25 ए.एल.6660) ने वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जात असतांना नागराणी पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारा ट्रक (एम.एच.18 ए.एल.3731) ने जोरदार धडक दिल्याने ढेकणे यांचा जागीच मृत्यू झाला. वरणगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार शेळके, नागेंद्र तायडे, भालशंकर, निकम, वाहतूक पोलिस मोरे आदींनी अपघातस्थळी धाव घेत जेसीबीद्वारे कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढला.
कुर्‍हा काकोडा परीसरात लोकप्रिय तलाठी म्हणून ढेकणे यांची ख्याती असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई-वडील असा परीवार आहे.


कॉपी करू नका.