भुसावळातील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्रता प्रकरण : 11 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी


Bhusawal Municipal Council President Gayatri Bhangale disqualification case: Next hearing on August 11 भुसावळ (बुधवार, 29 जुलै 2026) : जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने भुसावळातील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. 23 एप्रिल रोजी दिलेल्या या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत तसेच भुसावळातील रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत गायत्री भंगाळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवार, 28 रोजी कामकाज झाले. आता पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी म्हणजे 11 ऑगस्टला होण्याचे आदेश न्यायमूर्ती किशोर संत व न्यायमुर्ती अजीत बी.कढेठाणकर यांनी दिले आहेत.

निकालाकडे शहराचे लागले लक्ष
जळगाव जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने गायत्री भंगाळे-गौर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये प्रतिवादींचे वकिल न्यायालयात हजर होते. न्यायालयाने आता पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी म्हणजे 11 ऑगस्टची तारीख दिली असून निकालाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

गायत्री भगाळे-गौर यांच्यातर्फे अ‍ॅड.संजीव देशपांडे, अ‍ॅड.ऐरमवार यांनी तर राहुल तायडे व अन्य यांच्यातर्फे अ‍ॅड.महेश देशमुख, अ‍ॅड.वसंत भोलाणकर यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !