यंदाच्या मोसमात प्रथमच हतनूरच्या सर्व 41 दरवाजातून पाण्याचा विसर्ग

यंदाही भरणार धरण : उगमक्षेत्रात संततधार पावसाने वाढली आवक


Water is being discharged from all 41 gates of Hatnur for the first time this season भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने गुरुवारी रात्रीपासून पाण्याची दमदार आवक सुरू आहे. वाढत्या साठ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आल्याचे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

मोसमात प्रथमच उघडले सर्व दरवाजे
गुरुवारी दिवसभरात झालेल्या दमदार पावसानंतर धरणात पाण्याची आवक वाढताच शुक्रवारी पहाटे एक वाजता 14, दोन वाजेच्या सुमारास 20 तर तीन वाजता 30 दरवाजे तर सहा वाजता 32, सात वाजता 36 दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले तर 31 रोजी सकाळी 10 वाजता 32 दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले व 12 वाजता संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले. या क्षणाला कॅनॉलमधून 5.66 क्यूमेक्स विसर्ग होत असून 86 मिलीमीटर पर्जन्यमान तर एकूण पाऊस 258 मिलीमीटर झाल्याचे पाणीपुरवठा अभियंता एस.जी.चौधरी यांनी कळवले आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटारपंप, कृषी अवजारे व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !