कर्तव्यात निष्काळजी भोवली : जळगाव मुख्यालयातील चौघा पोलिसांचे निलंबन


जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ

जळगाव : जिल्हा न्यायालयात गार्ड ड्युटी व सेंट्रल ड्यूटी करणार्‍या चौघा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा न्यायालय परीसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात चोरी झाल्याचा ठपक ठेवत चौघा पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी निलंबित केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहुल अरुण पारधी अशी निलंबीत कर्मचार्‍यांची नावे आहेत.

3 ऑगस्टची चोरी भोवल्यानेच निलंबन
3 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालय परीसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात चोरी झाली. त्याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस मुख्यालयातून जिल्हा न्यायालयात गार्ड ड्युटीसाठी हवालदार राजेंद्र भिका चव्हाण हे गार्ड अंमलदार होते तर पोलिस शिपाई प्रवीण शंकर वाघ, शिपाई राजेंद्र प्रताप दोडे तसेच शिपाई राहुल अरुण पारधी यांना सेंन्ट्रल ड्युटी होती. चौघांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने चोरट्यांना चोरी करण्यास वाव मिळाल्याचा ठपका ठेवत शासकीय सेवेतू निलंबित करण्यात आले.


कॉपी करू नका.