छत्रपती संभाजीनगरमध्ये स्केटिंगचा विक्रम : भुसावळातील तिर्थराज पाटीलचा विशेष स्केटर म्हणून सत्कार

120 स्केटर्सचे सलग 79 मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग ; ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद


भुसावळ (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत देशभक्ती, क्रीडाजिद्द आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. 15 ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे तब्बल 120 स्केटर्सनी सलग 79 मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग करून आंतरराष्ट्रीय विक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. या विक्रमाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये करण्यात आली.

रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या मान्यतेने तसेच रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि अंबे स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा भव्य विक्रम आयोजित करण्यात आला.

या ऐतिहासिक विक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्याहस्ते करण्यात आले.

तिरंग्याच्या साक्षीने 120 स्केटर्सच्या जिद्दीने आणि साडेतीनशे ते चारशे पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेला हा विक्रम छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रातील एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण ठरला.

या कार्यक्रमात आठ वर्षे वयाच्या गटात सर्वोत्कृष्ट स्केटर म्हणून भुसावळच्या एन.के.नारखेडे स्कूल व सिल्व्हर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी तिर्थराज मंगेश पाटीलचा विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यशस्वीतेसाठी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव भिकन अंबे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफिसियल राधिका अंबे, गणेश बनसोडे, प्रियंका राजपूत तसेच साई अंबे, तेजस सोनाळकर, विवेक मालोदे आणि सुदीप तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !