जोगलखेडे-भानखेडे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
रोटरी व इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि इनरव्हील क्लब भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दप्तर आणि शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्याने जोगलखेडे व भानखेडे येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष तथा इनरव्हील सदस्या रजनी सावकारे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले



यांची होती उपस्थिती
यावेळी इनरव्हीलच्या सचिव कविता पाचपांडे, सदस्य अनिता महाजन तसेच जोगलखेडे सरपंच सारीका पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, माजी सरपंच पंकज पाटील, मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे, भानखेडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे, ग्रामसेविका योगीता विसपुते, शिक्षक सोनाली तायडे, सुधीर तायडे, अंगणवाडी सेविका निर्मला पाटील, मंगेश पाटील, ठकसेन कोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

