मनसे नेते बाळा नांदगावकर आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर


भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे शनिवार, 29 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्यात दौर्‍यावर आहेत. माजी महसूलमंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदगावकर हे खडसे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत.

असा आहे दौरा
बाळा नांदगावकर यांचे शनिवारी रात्री 9.30 वाजता राजधानी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते मुक्ताईनगरात जातील व आमदार एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी भेट देतील. यावेळी खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत.



यानंतर नांदगावकर हे भुसावळ येथे मुक्कामी राहणार असून रविवार, 30 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता राजधानी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

बाळा नांदगावकर यांच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री 9.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !