भुसावळात रेल्वे बोर्ड सदस्यांसोबत रेल कामगार सेनेची विविध प्रश्नांवर चर्चा
भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) रेल्वे बोर्डाचे सदस्य (अवसंरचना) विवेक कुमार गुप्ता हे शनिवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आल्यानंतर त्यांची डीआरएम कार्यालयात रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करीत
मागण्यांचे निवेदन दिले.

अशा आहे मागण्या
डीआरएम कार्यायलाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावावा, जुनी पेंशन स्कीम सुरू करावी, लार्जेस स्कीम सुरू करावी, जे एसएसई एकाच जागेवर चार-पाच वर्षापासून कार्यरत आहेत त्यांची बदली करण्यात यावी, रेल्वे रुग्णालयात त्वचारोग स्पेशालिस्ट व नाक, कान, घसा स्पेशालिस्ट डॉक्टरची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
रेल कामगार सेनेचे मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल कार्याध्यक्ष प्रीतम टाक, संयुक्त सचिव विनोद वाघे, उपाध्यक्ष अरविंद थोरात, पीओएच सचिव मुकेश महाजन, एमओएच अध्यक्ष रुपेश तायडे, उपाध्यक्ष मोहन राजपूत यांच्यासह रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
