p>

भुसावळ पालिकेची शुक्रवारी ‘विशेष सभा’


खड्डेमय रस्त्यांचा तिढा सुटण्यासाठी ठराव होणार संमत

भुसावळ : खड्ड्यांमुळे शहरवासीयांची हाडे खिळखिळी झाल्याने नगराध्यक्ष व आमदार तसे पालिका प्रशासनाविषयी नागरीक तीव्र रोष व्यक्त करीत असल्याने महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आमदार संजय सावकारे यांनी रस्ता कामासांठी विशेष परवानगी मागितली होती. फडणवीस यांनी आठ दिवसात या बाबीस मंजुरी देण्याचे आश्‍वासन दिल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे तर रस्ता कामांसाठी पालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक असल्याने शुक्रवार, 30 रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.


कॉपी करू नका.