भुसावळातील बियाणी चेंबर्समध्ये ‘विघ्नहर्त्या’ गणरायाची विधीवत स्थापना
भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : शहरातील नामांकीत बियाणी चेंबर्समध्ये सोमवारी ‘विघ्नहर्त्या’ गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाची स्थापना करून पूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी विनोद बियाणी व स्मिता बियाणी यांच्याहस्ते बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना आणि पूजन करण्यात आले. या सोहळ्याला बियाणी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन तथा बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या आनंदोत्सवात पियुष बियाणी, व्यवस्थापक गोपाळ ठाकूर, राजीव पारीख, राजू मोरे यांच्यासह बियाणी ग्रुपचे इतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण बियाणी चेंबर्सचा परिसर भक्तीमय झाला आहे. यावेळी मनोज बियाणी यांनी पावसासाठी बाप्पाला साकडे घातले व चांगला पाऊस पडून बळीराजाला चांगले दिवस येण्याची प्रार्थना केली.
