पोषण आहाराची वाहतूक करणार्या वाहनाला अपघात : पाचोर्यातील दोन्ही मजूर ठार
जामनेर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : शालेय पोषण आहाराची वाहतूक करणार्या 407 टेम्पोचे टायर अचानक फुटल्याने भरधाव टेम्पा उलटून झालेल्या अपघातात पाचोरा शहरातील दोन मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ मंगळवार, 15 रोजी घडला. मृतांमध्ये जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) यांचा समावेश आहे.
टायर फुटल्याने अपघात
शालेय पोषण आहार पाचोरा येथून 407 वाहनातून पुढे नेला जात असताना वाहतुकीदरम्यान दोन्ही मजूर वाहनातील पोषण आहाराच्या गोण्यांवर बसले होते. शेंदुर्णीजवळ अचानक टायर फुटल्याने वाहन पलटी झाले आणि दोन्ही मजूर बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.



