नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक : चालक जखमी


नशिराबाद (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : जळगाव बायपासवरील तरसोद उड्डाणपुलाच्या अलीकडे ट्रेलर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत समोरून येणार्‍या कंटेनरला जोरदार धडक दिल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात कंटेनर चालकाला दुखापत झाली असून कंटेनरचे नुकसान झाले.

असा घडला अपघात
चालक बिहारीलाल श्रीहिरालाल यादव (48, धारिकपुरा, ता. कोटपुतली, बहेरोड, राजस्थान) यांनी ट्रेलर (क्रमांक एन.एल.01 के.1104) हा 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अत्यंत निष्काळजीपणे चालवत जळगाव बायपासवरील तरसोद उड्डाणपुलाच्या अलीकडे समोरून येणारा कंटेनर क्रमांक (एच.आर.47 एफ.2581) ला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालकाला दुखापत झाली असून कंटेनरचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी अपघाताची नोंद केली. तपास हरेश पाटील करीत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !