भुसावळातील श्री संत गाडगे बाबा महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा प्रारंभ
भुसावळ (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालयात सोमवार, 14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते हिंदी सप्ताहाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.
15 ते 20 दरम्यान विविध स्पर्धा
15 ते 20 सप्टेंबरदरम्यान आयोजित या सप्ताहात महाविद्यालयात विविध स्पर्धा होत आहेत त्यात शुद्ध लेखन, पत्र लेखन स्पर्धा, राजभाषा पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य (घोष-वाक्य) स्पर्धा निबंध स्पर्धा, गद्य व काव्य वाचन स्पर्धा, शोधनिबंध स्पर्धेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषा आणि राजभाषा म्हणून तिचे महत्त्व रुजवणे, तसेच भाषेच्या प्रचार-प्रसाराशी संबंधित आवडीनिवडी विकसित करणे, हा या सप्ताहाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.अनुपम आर. शर्मा यांनी हिंदी सप्ताहाची रूपरेषा मांडून आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून केली.



पत्र लेखन स्पर्धा
पहिली स्पर्धा म्हणून शुद्ध लेखन आणि पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी हिंदी विभागाचे प्रतिनिधित्व करताना प्रा.डॉ.सुधीर एन.शर्मा, प्रा.डॉ.विवेक जोशी, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे, प्रा.हेमांगी कोळी उपस्थित होत्या. आभार हिमांगी कोळी यांनी मानले.
