नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : शेतकर्‍यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी जाळ्यात

पाच चोरीच्या गुन्ह्यांची उकल; 85 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त


नंदुरबार (मंगळवार, 15 सप्टेंबर 2026) : शेतकर्‍यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य तसेच पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी करणार्‍या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी खोकराळे, ता.नंदुरबार येथील चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 85 हजार 900 रुपये किंमतीच्या पाच इलेक्ट्रिक मोटारी व वायर जप्त केल्या असून तब्बल चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

या संशयीतांना अटक
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पथकाने गणेश आप्पा भील (30), सोमा गोमा भील (28), बादल मनोज भील (21), समाधान रवींद्र भील (20, सर्व रा.खोकराळे, ता.नंदुरबार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.




पच गुन्ह्यांची उकल
चौकशीत संशयितांकडून नंदुरबार तालुक्यातील शेतांमधून चोरी केलेल्या एकूण पाच इलेक्ट्रिक मोटारी व वायर हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील पाच गुन्हे उघडकीस आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चिते, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, यशोदीप ओगले, राहुल पांढारकर आदींच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !