मनवेलला महर्षी वाल्मिकी गणेश मंडळात श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर


यावल (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) :  यावल तालुक्यातील मनवेल गावात महर्षी वाल्मिकी गणेश मंडळात श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात 70 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना जागेवर मोफत औषध वितरण करण्यात आले.

नागरिकांची आरोग्य तपासणी
मनवेल, ता.यावल येथे श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत महर्षी वाल्मिकी गणेश मंडळात बुधवार, 16 सप्टेंबर 2026 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व डीपीएम डॉ.पंकज शिंपी यांच्या सूचनेनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.शिबिरात नागरिकांची एनसीडी आरोग्य तपासणी, एनसीडी कॅप आयोजित करण्यात आला. नागरिकांना विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरासाठी मेडिकल ऑफिसर डॉ.मुकेश चौधरी, डॉ.अस्मा परविन शेख, डॉ.राजू तडवी, अधिपरिचारिका वृषाली पाटील, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, सरदार कनाशा तसेच आशा स्वयंसेविका रंजना कोळी, पूनम पाटील व ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.




सर्वांचे आरोग्य, सर्वांचा अधिकार या संदेशातून नागरिकांनी आरोग्याची नियमित काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. निरोगी नागरिक-सुदृढ समाज हा संदेश यावेळी देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !