यावल शहर व तालुक्यातील पाच गावांमध्ये ‘श्री’चे विसर्जन

पाच दिवसाच्या बाप्पाला उत्साहात दिला निरोप


यावल (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : यावल शहर व तालुक्यातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव आणि सावखेडासीम या पाच गावातील पाच दिवसाच्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. शहरात मोठ्या उत्साहात मिरवणुका निघाल्या तर संपूर्ण विसर्जन मिरवणुका शांततेत पार पार पडल्या.

21 मंडळांनी दिला बाप्पांना पनिरोप
शहर व तालुक्यात यावल पोलिसांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील 21 मंडळाच्या वतीने शुक्रवारी मोठ्या जल्लोषात वाद्य, वृंदाच्या गजरात निरोप देण्यात आला. शहरातील मेन रोडवरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, रात्री 12 वाजेच्या निर्धारित वेळेत संपूर्ण शहरातून मिरवणुका या नगरपालिकेजवळील रेणुका माता मंदिरापर्यंत पोहोचल्या. तेथून भुसावळ रस्त्यावरील हतनुर कालवा तसेच तापी नदीपात्रात श्रींचे विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
तत्पूर्वी शहरात अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूरचे डिवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडेंसह सहा.निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, अनिल महाजन, एम.जे.शेखसह सहायक फौजदार, हवालदार, होमगार्ड अशा शेकडोच्या संख्येतील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील काझी मस्जीद जवळ शांतता समितीच्या सर्वधर्मीय पदाधिकार्‍यांकडून विसर्जन मिसवणुकीचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातदेखील नायगाव, कोरपावली, डांभूर्णी, दहिगाव व सावखेडासीम या पाच ही गावात पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !