भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये बक्षीस वितरण

स्व.बाबासाहेबांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये स्व.बाबासाहेबांची 46व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंतांचा सोमवारी गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे होते. सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सभासद विकास पाचपांडे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते कै.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका रुपाली चौधरी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांचा परीचय करून दिला.

विविध स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव
स्व.बाबासाहेबांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या सायन्स क्वीझ, रांगोळी, सलाद, मास्क, ग्रीटींग कार्ड मेकींग, मेहंदी, आर्ट क्राप्ट आदी स्पर्धेतील प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले.

इयत्ता पाचवी ‘ब’ च्या वर्गाला आदर्श वर्ग म्हणून ट्रॉफी देण्यात आली. तसेच चौथी, पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप गुणवत्ता यादीमध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

भुसावळ शहरातील सहभागी झालेल्या पोदार इंटरनॅशनल स्कुल आणि एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलला प्रथम क्रमांक विभागून तर व्दितीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कुलला तसेच द वर्ल्ड स्कूलला तृतीय क्रमांक सायन्स क्वीझमध्ये मिळाल्यानंतर त्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले.

सूत्रसंचालन गजाला बासीत यांनी तर रुही बासीत यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !