भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा
भुसावळ (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : शहरातील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात 24 रोजी राष्ट्रीयसेवा योजना दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी क्षितिज दिव्यांग स्कूलमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी भेट देऊन त्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप केले तसेच त्यांच्यासोबत काही मैदानी खेळ खेळून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत सांस्कृतिक कार्यक्रमही घैतला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.मीना चौधरी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.निलेश गुरचळ, प्रा.रुकसाना शेख, प्रा.रवीकांत वासनिक, प्रा.उज्वला महाजन, प्रा.गिरीश सरोदे उपस्थित होते. या भेटीत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत उत्साहपूर्वक सक्रिय सहभाग नोंदविला.
