रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : रेल्वेचा बुधवारी ब्लॉक : देवळाली, बडनेरा व ईगतपुरी मेमू रद्द
कसबे सुकेने आणि खेरवाडी स्थानकांवर कुंभ-2027 च्या पार्श्वभूमीवर यार्ड पुनर्रचनेचे काम ः दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर पाच गाड्यांचे बदलले मार्ग
भुसावळ (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ-2027 च्या व्यापक तयारीचा एक भाग म्हणून रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहेत. या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ दरम्यान कसबे सुकेने आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचना कामाशी संबंधित नॉन-इंटरलॉकिंग काम बुधवार, 30 सप्टेंबर रोजी केले जात आहे. या अनुषंगाने देवळाली, बडनेरा व ईगतपुरी मेमू रद्द करण्यात आली असून दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत शिवाय सात गाड्या या दिवशी उशिराने धावणार आहेत.
बुधवार, 30 रोजी या गाड्या रद्द
11113 देवळाली-भुसावळ मेमू व 11114 भुसावळ-देवळाली मेमू तसेच 11119 इगतपुरी-भुसावळ व 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू तसेच 61130 बडनेरा-नाशिक व 61129 नाशिक-बडनेरा मेमू मूळ स्थानापासून रद्द करण्यात आली आहे.
या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
12072 हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस बुधवार, 30 रोजी हिंगोली डेक्कन येथून सुटणारी गाडी मनमाड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेशन केली तर ही गाडी मनमाड ते मुंबई दरम्यान रद्द असेल तर 12071 मुंबई -हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस बुधवार, 30 रोजी मुंबई स्थानकाऐवजी मनमाड येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द असेल.
पाच गाड्यांचे मार्ग परिवर्तन
13379 धनबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सोमवार, 28.09.2026 रोजी धनबाद येथून सुटलेली गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल तर 15065 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मंगळवार, 29 रोजी गोरखपूर येथून सुटणारी गाडी नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. 11056 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मंगळवार, 29 रोजी गोरखपूर येथून सुटणारी गाडी नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. 22866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 29 रोजी गोरखपूर येथून सुटणारी गाडी नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. 12534 मुंबई-लखनउ एक्सप्रेस 30 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथून सुटणारी गाडी लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अंकाई मार्ग लखनउला पोहचेल.
30 रोजी सात गाड्या उशिराने धावणार
12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ -निफाड दरम्यान एक तास 25 मिनिटे तर 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ-निफाड दरम्यान एक तास थांबवण्यात येईल. 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ-निफाड दरम्यान तीन तास व 12335 भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ-निफाड दरम्यान तीन तास थांबवण्यात येईल. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस इगतपुरी-नाशिक दरम्यान एक तास 15 मिनिटे तसेच 12362 मुंबई-आसनसोल एक्सप्रेस इगतपुरी-नाशिक दरम्यान एक तास 15 मिनिटे थांबवण्यात येईल. 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस इगतपुरी-नाशिक दरम्यान एक तास 10 मिनिटे थांबवण्यात येईल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असून होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे शिवाय ब्लॉकच्या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही केले आहे.
