अट्टल चौघे घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात
जळगावसह अमळनेर, चोपडा, धरणगावात घरफोड्यांची कबुली
जळगाव : जिल्हाभरात सुरू असलेल्या चोर्या-घरफोड्यानंतर पोलिस प्रशासनावर टिका सुरू असताना गोपनीय माहितीनंतर जळगावसह अमळनेर, चोपडा, धरणगावात घरफोडी करणार्या चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिस सोनुसिंग जगदिशसिंग बावरी (21, रा.शिरसोली नाका, जळगाव), प्रवीण रणछोड पाटील (28, रा.बिडगाव, ता.चोपडा), राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव (30, रा.वाघनगर, हल्ली मुकाम, परदेशीपुरा, इंदोर), अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील (25, रा.नांद्रा, जि.जळगाव) अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी जळगाव शहरासह एमआयडीसी, अमळनेर, चोपडा, धरणगाव आदी ठिकाणच्या घरफोड्यांची कबूली दिली तर त्यांच्याकडून दागिण्यांसह ऐवज हस्तगत करण्यात आला. आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत दिली. प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी उपस्थित होते.