कार्यकर्त्यांच्या चुका पोटात गिळून गळ्याशी गळा लावणारा दिलदार नेता हरपला
भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊंच्या निधनानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केली भावना
वरणगाव : भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार, माजी आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. स्व.हरीभाऊ जावळे 7 मार्च रोजी वरणगाव नगरपरीषदेच्या विविध विकासाकांमाच्या लोकार्पण सोहळ्याला माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत वरणगावला आले तेव्हा वरणगाव शहरात झालेल्या विकासकामाचे भरभरून त्यांनी कौतुक केले होते. जळगाव जिल्ह्यात जामनेरनंतर वरणगाव नगरपरीषद ही विकासाच्या बाबतीत एक नंबर असून वरणगावकरांचे कौतूक त्यांनी त्यावेळी केले होते. विकासकांमाच्या जोरावर वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात त्यांनी वरणगावात सांगितली असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.
स्व.हरीभाऊंच्या जाण्याने पक्षात निर्माण झाली पोकळी
स्व.हरीभाऊ जावळे यांनी खासदार असतांना हनुमान व्यायाम शाळेला 10 लाखांचा निधी दिला होता. वरणगाव शहराच्या विकासात खासदार असतांना त्यांनी भरीव योगदान होते. कधीही हरीभाऊ रागावले नाहीत. वैर न ठेवता चुक पोटात गिळून मला जवळ घेउन त्यांनी गळ्याशी लावले व मायेचा हात पाठीवर फिरवणारा माझा मार्गदर्शक नेता आज पडद्याच्या आड गेल्याने मनात खूप दुःख झाले असल्याचे सुनील काळे म्हणाले. जिल्ह्यात भाजपाची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून न निघणारी असल्याचे ते म्हणाले.


