धुळ्यात मुख्याध्यापिकेने भरवली ‘लाचखोरीची शाळा’


42 हजार शंभर रुपयांची लाच घेताना उर्दू शाळेची मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात

धुळे : शिक्षकाच्या बँक खात्यात मे 2020 चे वेतन जमा करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली गत महिन्यांचे मिळून 42 हजार 100 रुपये लाचेची मागणी करून लाच पंचांसमक्ष स्वीकारणार्‍या हाजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निकहत नसरीन अ.लतीफ (40, रा.126, ब, ब्लॅक नं.21, कामगार नगर, हजार खोली, धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने धुळ्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
धुळे शहरातील 33 वर्षीय तक्रारदार हे शिक्षक असून त्यांनी लाच मागितल्याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. आरोपी मुख्याध्यापिकेने बुधवारी सायंकाळी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, जयंत साळवे, प्रकाश सोनार, शरद काटके, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदीप कदम, भुषण शेटे, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !