अमळनेर शहरात पूजार्‍याकडे धाडसी घरफोडी : एक लाख 37 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला


अमळनेर (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : अमळनेर शहरातील शिवशक्ती कॉलनी परिसरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत एक लाख 37 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्यांनी तब्बल 63 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबवले असून त्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत नऊ लाखांपर्यंत आहे.

बंद घर टार्गेट
तक्रारदार गणेश शांताराम जोशी (26) हे पूजारी असून शिवशक्ती कॉलनीत वास्तव्याला आहेत. 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केली.

दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून त्यामधील 15 ग्रॅम वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीची पोत, दिड ग्रॅम वजनाच्या रिंगा, एक ग्रॅमची नथ, साडेतीन ग्रॅमचे झुमके, पाच ग्रॅमची अंगठी, 21 गॅ्रम वजनाची सोन्याची चैन, आठ ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, तीन ग्रॅमचे सोन्याचे तुकडे, 15 ग्रॅमचे सोन्याचे जोडवे मिळून एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विनायक कोते करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !