शेलवड घाटात ट्रक उलटला : राजस्थानच्या क्लीनरचा मृत्यू, दोघे जखमी


बोदवड (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : बोदवड-जामनेर मार्गावरील शेलवड घाटात भरधाव ट्रक वळणावर उलटल्याने राजस्थानच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर तक्रारदारासह ट्रकचालक जखमी झलाा. हा अपघात गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी बोदवड पोलिसात ट्रक चालक विक्रमसिंग गोवर्धनलाल भील (नाहर्डी, तहसील झालरापाटल, राजस्थान) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात एक जण ठार
बोदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील बाली येथील
भगवानसिंग फुलचंद गुजर (36, रा.बाली) हे भावासह राजस्थान पासिंगचा ट्रक (आर.जे.17 जी.बी.1825) ट्रकने प्रवास करीत असताना शेलवड शिवारात चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने ट्रक पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात ट्रकचा क्लीनर सावरीयालाल रतीराम गुजर (30, रा.बाली, बालरापाटन, जि.झालवाड, राजस्थान) यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !