फोटो व्हायरलची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : पारोळा तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा
पारोळा (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : फोटो व्हायरलची धमकी देत पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी मच्छिंद्र ईश्वर ठाकरे (पारोळा तालुका) विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडीता आपल्या वडील व आईसह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे नकळत काढलेले फोटो संशयीत मच्छिंद्र ठाकरेने व्हायरलची धमकी दिली तसेच आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देत आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून ते 20 ऑक्टोबर 2026 दरम्यान अत्याचार केला तसेच 20 रोजी आरोपीने पीडीतेच्या घरी येवून पीडीतेला माझ्या घरी चल अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. पीडीतेच्या आईने पारोळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

