बामणोद गावात फटाके फोडत असल्याच्या कारणावरून वाद ; एकाला मारहाण


यावल (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील बामणोद या गावात विकास दूध डेअरीजवळ फटाके फोडत असल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका 22 वर्षीय तरुणाला एकाने मारहाण केली. लाकडी काठीने मारून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले बामणोदला ?
बामणोद गावातील विकास दूध डेअरी समोर फटाके फोडत असल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून चेतन किशोर भिरूड (22) या तरुणाला उमेश केदारे यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. लाकडी काठीने हाता-पायावर मारून दुखापत केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांना चेतन भिरूड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !