डोंगरकठोरा शेतशिवारात सर्पदंशाने शेतकर्याचा मृत्यू
यावल (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील डोंगर कठोरा शेतशिवारात 45 वर्षीय शेतकर्याला शेतात सर्प सदृश्य काहीतरी चावले. त्यानंतर शेतकरी घरी आल्यानंतर त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले. तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
डोंगरकठोरा गावातील शेतकरी शशिकांत भिका बावस्कर (45) हे बुधवारी आपल्या शेतात काम करत असतांना त्यांना सर्प सदृश्य दंश झाला. काहीतरी चावल्याचे त्यांना जाणवले तेव्हा ते घरी येऊन गेले, घरी काही वेळानंतर त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले तातडीने त्यांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.







