किनगाव बुद्रुक गावातून 35 वर्षीय तरुणाचे अपहरण

यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल


यावल (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक या गावातून 35 वर्षीय तरुणाचे अज्ञाताने अपहरण केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
किनगाव बुद्रुक गावातील रहिवासी महेश सुधाकर मोरे (35) या तरुणाचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्याला कुठेतरी डांबून ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दीपक सुधाकर मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !