भुसावळसह मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर ; जाणून घ्या 19 गावांचे आरक्षण


भुसावळ (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड या तीन तालुक्यांतील पोलीस पाटील पदांच्या आरक्षणाची बहुप्रतिक्षित सोडत गुरुवारी भुसावळच्या प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात अत्यंत उत्साहात व पारदर्शक वातावरणात पार पडली.
उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रसंगी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्यासह संबंधित महसूल विभागातील प्रमुख अधिकारी आणि विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी निवडीचा मार्ग सुकर
गावनिहाय आरक्षण निश्चित शासनाच्या नियमानुसार व निकषांनुसार सर्व प्रवर्गांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या दृष्टीने तापी सभागृहात प्राधिकृत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण जाहीर होताच इच्छुकांमध्ये नवचैतन्य पसरले असून आगामी निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.









प्रमुख गावांची आरक्षण वर्गवारी (अंतिम आरक्षण तक्ता)
1) मानपूर- अनुसूचित जाती (महिला)
2) धानोरी- अनुसूचित जाती
3) पंचाणे- अनुसूचित जाती
4) विल्हाळे- अनुसूचित जाती
5) वरखेड खु.॥- अनुसूचित जाती (महिला)
6) पळासखेडा खुर्द- अनुसूचित जमाती (महिला)
7) जोगलखोरी- अनुसूचित जमाती
8) निंभोरा खुर्द- अनुसूचित जमाती
9) सावतर- अनुसूचित जमाती ।
10) राजुरा- अनुसूचित जमाती (महिला)
11) डोलारखेडा- भज-ब (भटक्या जमाती-ब)
12) कासारखेडा- भज-क (भटक्या जमाती-क)
13) वराड खुर्द- भज-क (महिला)
14) पिंप्रीसेकम- विमाप्र (विशेष मागास प्रवर्ग)
15) जलचक्र बु.॥- इतर मागास प्रवर्ग
16) रेवती- इतर मागास प्रवर्ग (महिला)
17) अंजनसोंडे- इतर मागास प्रवर्ग
18) भोकरी- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास
19) भानखेडा- आर्थिक दुर्बल घटक

आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पार पडल्याचे सांगत प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. आरक्षणाची यादी जाहीर झाल्यामुळे आता तिन्ही तालुक्यांतील गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठीच्या स्पर्धात्मक वातावरणाला सुरुवात झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !