जळगावात अल्पवयीन भाचीवर नराधम मामानेच केला अत्याचार ; आरोपीला अटक


जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : शहरातील एका भागातील अल्पवयीन 11 वर्षीय भाचीवर नात्याने चुलत मामा असलेल्या आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयीताविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वारंवार अत्याचाराचा आरोप
रामानंद हद्दीतील एका भागात 11 वर्षीय पीडीता कुटूंबासह वास्तव्याला आहे. पीडीतेचा चुलत मामा असलेल्या संशयीत निलेश कमलाकर गुरव (यावल तालुका) याने 2021 ते 2024 दरम्यान वेळोवेळी पीडीतेवर अत्याचार केला. पीडीतेला त्रास असह्य झाल्यानंतर तिने या प्रकरणी वाच्यता केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सहा.निरीक्षक अंकुश वारुंगसे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !