भुसावळातील गंभीर जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव- भुसावळ येथील माळी भवनसमोर 15 ऑगस्ट रोजी अपघातात जखमी झालेल्या राजेश भालचंद्र शिरनामे (52, रा.साईबाबा मंदिराजवळ, भुसावळ) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. भुसावळ येलि राजेश शिरनामे हे ट्रान्सपोर्टमध्ये कामाला असून 15 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. शिरमाने यांच्या पश्‍चात पत्नी मनिषा, मुलगा तेजस व मुगली चैताली असा रिीवार आहे. मुलगा तेजस हा प्रथम वर्ष वाणिज्य तर चेताली ही दहावीला शिक्षण घेत आहे. मंगळवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रईस शेख व पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पाटील यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.


कॉपी करू नका.