वरणगाव पोलीस स्टेशनतर्फे शिवबा मित्र मंडळाला द्वितीय क्रमांक देऊन गौरव

बक्षिसाची परंपरा कायम राखली : दरवर्षी विविध सजीव देखाव्याचे वेधतात लक्ष


वरणगाव (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सार्वजनिक नवरात्र/दुर्गोत्सव 2026 च्या विसर्जन मिरवणुकीत समाज प्रबोधनाच्या सूचनांचे पालन करीत दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल शिवबा मित्र मंडळ, मोठा माळी वाडा या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर मंडळ पदाधिकार्‍यांचा गौरव करण्यात आल. शिवबा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान-मोठे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, मार्गदर्शक सदस्य यांची मेहनत, जिद्द, सहकार्य यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना शिवबा मंडळाचे अध्यक्ष संतोष माळी यांनी व्यक्त केली.

वरणगाव पोलिसांनी केला मंडळाचा गौरव
वरणगाव पोलिस स्टेशन यांच्यातर्फे शिवबा मित्र मंडळ यांना समाज प्रबोधन यांच्यावर शक्ती आणि भक्ती यांचा संगम छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सजीव देखावा सादर केल्याने मंडळाची पोलीस स्टेशनतर्फे द्वितीय क्रमांकाने निवड करण्यात आली. वरणगावचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याहस्ते शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष माळी, उपाध्यक्ष भूषण माळी, किरण माळी, पांडू माळी, बापू माळी, संकेत माळी, विशाल माळी, रितेश माळी, यश माळी, उमेश माळी, निखिल माळी, विवेक माळी, भूषण माळी, पवन माळी, प्रवीण माळी, आशिष माळी, वैभव माळी, सौरभ माळी, अभिषेक माळी यांच्यासह मंडळाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !