बांभोरीच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव- बांभोरी येथील संदीप भालचंद्र कोळी (31) या तरुणाने 20 ऑगस्ट रोजी विषप्राशन केल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 7.45 वाजता त्याचा मृत्यू झाला. हातमजुरी करून आई, वडील व तीन बहिणींसह वास्तव्यास असणार्‍या संदीपने कॅन्सरच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. 20 रोजी घरात कुणी नसतताना त्याने विष प्राशन केले मात्र ही घटना लक्षात येताच त्यास उपचारार्थ हलवण्यात आले. सात दिवस सुरू असलेल्या मृत्यूच्या झुंजीचा अखेर मंगळवारी झाला.


कॉपी करू नका.