भुसावळातील तरुणाने विषारी द्रव पदार्थ सेवन करीत उचलले टोकाचे पाऊल


भुसावळ (रविवार, 22 नोव्हेंबर 2026) : भुसावळ  शहरातील 39 वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी द्रव पदार्थ सेवन करीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जितेंद्र एकनाथ धनगर (38, वांजोळा रोड, राजस्थान मार्बल मागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
शहरातील वांजोळा रोड, राजस्थान मार्बल मागे जितेंद्र धनगर हा तरुण वास्तव्याला होता. 16 नोव्हेंबर रोजी तरुणाने काहीतरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्म्हत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला जळगाव सिव्हीलमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले असता उपचारादरम्यान 18 रोजी सकाळी 9.15 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !