चितोडाजवळ अपघातात जखमी झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


यावल (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : यावल-फैजपूर जाणार्‍या रस्त्यावर चितोडा या गावाजवळ अपघातामध्ये एक 23 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचाराकरिता प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू
यावल शहरातून फैजपूर जाणार्‍या रस्त्यावर चितोडा गावाजवळ अपघातात भरत विठ्ठल कोळी (23, रिधुर, ता.जि.जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तेथून उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात 16 नोव्हेंबर रोजी घडला होता. उपचारादरम्यान या तरुणाचा 22 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !