रावेर शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुम व खरवाची वाहतूक
नायब तहसीलदार संजय तायडे यांनी लक्ष देण्याची मागणी
रावेर (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : रावेर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम व भोकर नदीतून खरवाची जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करून अवैध वाहतूक होत आहे. याकडे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उत्खनन
रावेर शहरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास भोकर नदीत जेसीबी उतरवून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते असून ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही माफिया जुमावत नसल्याचे चित्र आहे.
रावेर शहरात मोठ्या प्रमाणात मुरुमाचेदेखील उत्खनन होत आहे. मुरुमाची वाहतूक करतांना परवाना पाच ट्रॅक्टरचा आणि वाहतूक दहा ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची चर्चा आहे. शासनाच्या महसूल विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून मंडळ अधिकारी व तलाठी यांचे जाणून बुजुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असताना स्थानिक प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसाधारण नागरिकांमधून होत आहे.
