पिळोदे बुद्रुक येथे 33 वर्षीय तरुणाची गळफास आत्महत्या
यावल (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील पिळोदे बुद्रुक या गावातील रहिवासी एका 33 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी दोराच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय घडले पिळोदा गावात
पिळोदे बुद्रुक गावातील रहिवासी हिरालाल ज्ञानदेव महाजन (33) हा आपल्या घरी असताना त्याने आपल्या राहत्या घरी लाकडी सर्याला दोर बांधून गळफास घेतला. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झाल्टे करीत आहे.
