भुसावळातील तक्षशिला बुद्ध विहारात संविधान दिन उत्साहात

संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन ; मान्यवरांनी व्यक्त केले संविधानाचे महत्त्व


भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील वरणगाव रोड भागातील तक्षशिला बुद्ध विहारात भारतीय संविधान दिनानिमित्त शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

संविधानाची दिली माहिती
निलेश जाधव यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विषद करताना संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. श्रावण साळुंके यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका कशा प्रकारे तयार झाली, याची सविस्तर माहिती दिली. ज्योती भालेराव यांनीही संविधानाचे महत्त्व पटवून दिले तर सरस्वती माने यांनी संविधानाच्या महतीवर स्वरचित कविता सादर केली. उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी रंजना शेळके, मंजू निकम, ज्योती भालेराव, सरस्वती माने, रेखा तायडे, माणिक उदागे, प्रा.महेंद्र भालशंकर, गणेश तायडे, अशोक शिरसाठ, श्रावण साळुंके, पी.टी.मोहिते यांच्यासह तक्षशिला नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !