यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात संविधान दिन उत्साहात
यावल (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात भारतीय संविधान दिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन, संविधान व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा व चर्चासत्र अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक प्रशांत महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.धीरज चौधरी, अॅड.मयूर सुरडकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.प्रश्नमंजुषा व चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती मिळण्यासोबतच लोकशाही मूल्यांची जाणीव झाली. विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त अध्यक्ष, मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्या .
