भुसावळात आज मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते अंडरग्राउंड जलकुंभाचे भूमिपूजन
जीएसआर सममुळे पाण्याचे स्टोरेज वाढणार : आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सहा दिवसाआड होणार
भुसावळ (रविवार, 29 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भूमिगत पाण्याच्या टाकीचे (जीएसआर सम) भूमिपूजन रविवार, 29 रोजी दुपारी 12 वाजता मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते वॉटर सप्लाय हाऊसमध्ये होत आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या जलकुंभामुळे पाण्याचे स्टोरेज करणे शक्य होणार असून त्यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन आठ दिवसांवरून किमान पाच ते सहा दिवसांवर येणार आहे.
यांची असेल उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्याला भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती महिमा अजय नागराणी, गटनेते बबलू बर्हाटे, प्रभारी मुख्याधिकारी जनार्दन पवार आदींची उपस्थिती राहणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांनी केले आहेत.
