आमदार गोपीचंद पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध : जिल्ह्यात आल्यास तोंडाला काळे फासण्याचा धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा इशारा


धुळे : भाजपाच्या असभ्य संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन आमदार गोपीचंद पडळकरांच्या वाचाळ वक्तव्याचा माध्यमातून झालेले आहे. देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आले असून स्वतःचे कोणतेही कर्तृत्व नसलेल्या पडळकर यांनी वयाचे भान न ठेवता देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत टिका केली असल्याची भावना धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी व्यक्त केली आहे.

पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध
ज्योती पावरा म्हणाल्याकी, राजकारणात टीका करताना ती सांभाळून करणे आवश्यक आहे. पडळकर यांची लायकी नसताना त्यांनी पवार साहेब यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वावर टीका करणे हे भाजप नेत्यांना शोभत नाही. वंचित विकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीसाठी पडळकर भाजपमध्ये आले आणि पातळी सोडून ते टीका करत असल्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहोत. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशाला कृषी, संरक्षण, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत एका उंचीवर नेऊन ठेवले. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे एक नेतृत्व आहे. या नेतृत्वाच्या वयाचा व अनुभवाचा विचार केल्यास पडळकर यांचे वयाएवढे पवार यांचे राजकीय कार्य आहे. पवार साहेब यांच्यावर व्यक्तव्य करणे म्हणजे निव्वळ बालिशपणा असून धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहोत तसेच पडळकरांना धुळे जिल्ह्यात प्रवेश बंदी करणार असून कुठे दिसले, भेटले तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देत असल्याचेही त्या म्हणाल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !