मुंबईतील पोलिस आयुक्त संजय बर्वेंना तीन महिने मुदतवाढ


मुंबई : मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. बर्वे ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार होते मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्याचे आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ दिली होती. बर्वे यांची निवृत्ती होणार असल्याच्या अपेक्षेमुळे अनेक आयपीएस अधिकारी या पदासाठी इच्छुक होते. बर्वे हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली. याशिवाय शिवसेनेनेही मराठी अधिकारी असल्यामुळे बर्वे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणे जवळपास निश्‍चित होते.


कॉपी करू नका.