भुसावळात भारीपाच्या आंदोलनानंतर ढाप्याची दुरुस्ती
भुसावळ- अमृत योजनेमुळे शहरातील चांगले डांबरी रस्ते उखडल्याने शहरवासीयांना अतोनात हाल-अपेष्टांचा सामना करावा लागत असतानाच शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल गौरवसमोर ढापा खचल्याने तीन फुटांचा खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेता भारीपाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी दुप9ारी आमदार व नगराध्यक्षांच्या मेहरबानीने तुमचा जीव जावू शकतो, खाली तीन फुटाचा खड्डा असल्याचा फलक लावून लोकप्रतिनिधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या आंदोलनाची दखल घेत दुसर्या दिवशी बुधवारी पालिका प्रशासनाने तातडीने ढाप्याची दुरुस्ती केल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.
रस्ता डागडूजीला मुहूर्त कधी?
मुख्यमंत्र्यांनी रस्ते डांबरीकरणाच्या कामांना परवानगी देण्यास परवानगी दिली असलीतरी लागलीच ही कामे शक्य नाही मात्र किमान खड्डेमय रस्त्यांना तात्पुरता का असेना डागडूजी केल्यास वाहनधारकांचा मोठा त्रास कमी होणार आहे. शहरातील सर्वाधिक दुरवस्था यावल रस्त्याची झाली असून दररोज अमृत पाईपलाईनीसाठी खोदण्यात आलेल्या चारीत वाहने अडकत असल्याने वाहनधारकांना क्रेनचा अतिरीक्त खर्च सोसावा लागत आहे.