धुळ्यातील खुनाचा पाच दिवसात उलगडा : दोघे आरोपी जाळ्यात


कुरीयरमध्ये काम करणार्‍या मुलाची हत्या लुटीतून : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धुळे : शहरातील शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ ट्रॅकॉन कंपनी काम करणार्‍या जितेंद्र शिवाजी मोरे (35) तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना 11 रोजी मध्यरात्री घडली होती. शहर पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर समांतर तपास सुरू असतानाच धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून दोघे आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाच दिवसात खुनाचा उलगडा करण्यात पथकाला यश आले आहे. या खून प्रकरणी राहुल उर्फ हंक्या सुनील घोडे (19, रा़ दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) व हर्षल जिजाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मयताकडील पैशांसह मोबाईल हिसकावत असताना त्याने प्रतिकार केल्याने आरोपींनी संतापाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल
11 रोजी रात्री 12.40 वाजता काही मुले बसस्थानकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना कमलाबाई शाळेजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी एक हजार 200 रुपयांच्या रोकडसह दोन मोबाईल लांबवले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींचे वर्णन प्राप्त करण्यात आले व त्यानंतर पोलिस आरोपी हंक्या घोडेपर्यंत पोहोचले व नंतर हर्षल पाटील यासदेखील अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार रफिक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, नाईकप्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, चालक गुलाब पाटील यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !