धामणगाव वणी तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात
700 रुपयांची लाच मागणी भोवली : धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धुळे : दोन शेत गटांच्या सातबारा उतार्यावर बँकेचा बोजा चढवण्यासाठी 700 रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या धामणगाव (वणी खुर्द) ता.धुळे येथील तलाठी महेंद्र वामनराव धाकड यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 27 जुलै रोजी आरोपविरुद्ध सापळा रचण्यात आला होता मात्र आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती मात्र वरीष्ठांचे आदेश व पुरावा प्राप्त झाल्याने आरोपीला अटक करण्यात आली.
संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
धुळे तालुक्यातील तक्रारदाराच्या वडिलांचे धामणगाव, ता.धुळे शिवारातील दोन शेत गटांच्या सातबारा उतार्यावर बँकेचा पीक कर्जाचा बोजा लावण्यासाठी आरोपी महेंद्र धाकड यांनी 27 रोजी 700 रुपयांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली व सापळ्याप्रसंगी आरोपीला संशय आल्याने त्याने लाच त्यावेळी स्वीकारली नव्हती. या प्रकरणी एसीबीला आरोपीने लाच मागितल्याचा पुरावा प्राप्त झाल्यानंतर त्यास गुरुवारी देवपूर, धुळे येथील घरातून अटक करण्यात आली.

यांनी केली आरोपीला अटक
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, हवालदार जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले, संदीप सरग, सुधीर सोनवणे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.

