भुसावळ स्टेट बँकेसह अॅक्सीस बँकेत ग्राहकांचे हाल
प्रिंटर नादुरुस्त : ज्येष्ठ सेवानिवृत्तांसह ग्राहक संतप्त
भुसावळ- हजारो ग्राहकांचे खाते असलेल्या भुसावळातील जामनेर रोडवरील मुख्य स्टेट बँक शाखेसत प्रिंटर मशीन गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ज्येष्ठांसह अन्य खातेदारांचे मोठे हाल होत आहेत. पूर्वी साध्या प्रिंटरवरून ग्राहकांना पासबुक अपडेट करून दिले जात होते मात्र आता नव्याने प्रिंटर आल्याने बँक पासबुकला बारकोड लावल्यानंतर ग्राहकांनाच थेट पासबुक प्रिंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रिंटरचा पार्ट खराब झाल्याने हे मशीन बंद पडले आहे. दरम्यान, जामनेर रोडवरील अॅक्सीस बँकेतही प्रिंटर नादुरुस्त असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
ग्राहकांना फटका
विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे स्टेट बँकेत खाते आहे शिवाय अनेकांना मोबाईल आदी सुविधांवरून खात्यातील शिल्लक तपासता येत नाही त्यामुळे ज्येष्ठ खातेदार पासबुक अपडेट करून महिनाभराचे नियोजन करतात मात्र स्टेट बँकेच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना फटका बसत आहे. मशीन नादुरुस्त असल्याच्या सबबीखाली ग्राहकांचे पासबुक अपडेट होत नाही मात्र तात्पुरता का असेना साध्या प्रिंटरवरून पासबुक अपडेट केल्यास ग्राहकहिताचे होणार आहे शिवाय अनेकांना रीटर्न भरण्यासाठीदेखील पासबुक अपडेट असणे गरजेचे मात्र बँकेच्या आडमुठेपणामुळे ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.