गव्हाणे फाट्याजवळ पीकअप वाहनाला अपघात : तीन मजुरांचा मृत्यू
सुमारे 30 वर मजुर जखमी : टायर फुटल्याने घडला अपघात
धुळे : मजुरांची वाहतूक करणार्या पीकअपचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला तर सुमारे 30 हून अधिक मजूर जखमी झाले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गव्हाणे फाट्यानजीक मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी मजुरांना नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील सेंधवा येथून शेतात मजूरी कामासाठी हे मजूर येत असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे योगेश राजगुरू हे पोलिस पथकासह दाखल झाले.

